Monday, June 4, 2012

The Soul

शरीर आणि शरीरापलीकडचे अशी दोन तत्वे असतात. शरीराचा संबंध भौतीकतेशी येतो, तर शरीरापलीकडचे जे असते त्याचा संबंध शक्तीशी (Eternal Energy) येतो. हे मी सांगत नाही. हे अनेक महानुभावांनी लिहून ठेवले आहे. मी फक्त ते येथे मांडण्याचा प्रयत्न करतोय. असो. त्या शक्तीलाच आपण परमेश्वर, परमात्मा म्हणतो. शरीराची इंद्रिये हि अवयवांशी निगडीत असतात. उदा. हाताचा संबंध स्पर्शेंद्रीयशी येतो तर नाकाशी घ्राणेंद्रिय निगडीत असते. हि इंद्रिये महत्वाची खरिच. कारण त्यांच्या माध्यमाने शरीराचा संबंध बाह्य जगाशी राहतो. पण मनुष्य इंद्रीयातच गुरफटून राहिला तर त्याची कधीच प्रगती (भौतिक वा अध्यात्मिक) होऊ शकत नाही. कारण इंद्रीयांपेक्षा महत्वाचे असते मन. पण मनही भरकटू शकते. ते नेहमीच सैरभैर धावते. त्याच्यावर अंकुश पाहिजे बुद्धीचा. बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे. परंतु, बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ काय असेल तो आत्मा. आत्मा म्हणजे त्या Eternal Energy चा अंश. आत्मा म्हणजे माणसाचा आंतरिक Consciousness. आत्म्याचा संबंध परमात्म्याशी असावा. आत्म्याच्या माध्यमाने परमात्म्याचे दर्शन घडते. म्हणून श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे, इंद्रीयांपेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी, तर बुद्धीपेक्षा श्रेष्ठतम आहे आत्मा.

आता आपण मनुष्यांचे चार प्रकार पाहूया. जो इंद्रियांच्या आदेशाप्रमाणे वागतो, तो वानर. म्हणजे माकड नव्हे. वानर म्हणजे वा-नर. दिसतोय तर नर (मनुष्य) पण वागणे (चांगल्या) मनुष्याप्रमाणे - नरासारखे - नाही. असा तो वानर. मनाच्या भाव-भावनाप्रमाणे वागतो तो नर. आपण सारे नर या सदरात मोडणारे आहोत. कारण आपण मनाला जास्त महत्व देतो. जो मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे हे जाणून मनावर बुद्धीचा अंकुश ठेवतो तो ज्ञानी. परंतु बुद्धीच्या पलीकडेही असलेल्या आत्म्याद्वारे परमात्म्याला जाणतो तो योगी! मघाशी म्हटले त्याप्रमाणे आपण नर आहोत. साधनेने, वैचारिक पातळी उंचावून बुद्धीचे अस्तित्व ओळखून ज्ञानी होऊ शकतो! पण खरा योगी होणे अवघड आहे, अशक्य नाही. शरीरापलीकडचे काही आहे ते बुद्धीने जाणून, आत्म्याशी गुज साधून (अंतर्मुख होऊन) - याला सुद्धा वैज्ञानिक परिमाणे आहेत बरका! - परमात्म्याचे अस्तित्व कळल्यावर (परमात्म्याचे दर्शन घडणे अजून दूर आहे) ज्ञानी हा योगी होऊ शकतो. ....... तेव्हा वरील परीक्षणे लावल्यावर आपण वा-नर च राहावे, कि नर असावे, कि ज्ञानी व्हावे अथवा योगीपुरुष होऊन परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा हे ज्याचे त्यांनी ठरवावे!!

Monday, January 2, 2012

Happy New Year - 2012

To All my Esteemed Readers,
Associates and Well-wishers
Wish you A Happy and Prosperous
New Year - 2012

Wednesday, October 12, 2011

English into Marathi Dictionary on-line

http://www.dictionary.tamilcube.com/marathi-dictionary.aspx

English to Marathi Dictionary
Powered by Tamilcube.com






Subscribe Now to Feeds